कोळोशी वरचीवाडी येथील श्री ब्राम्हणदेव मंदिर जिर्णोद्धार व कलशारोहण सोहळा

कणकवली ता.१४-:* श्री ब्राम्हण देव मंदिर कोळोशी वरची वाडी जिर्णोद्धार व कलशारोहण सोहळा दिनांक १९ व २० मे रोजी आयोजित करण्यात आला असून या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोळोशी ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई, स्थानिक समिती व ग्रामस्थांच्या वतीने कोळोशी वरची वाडी येथील श्री ब्राम्हण देव मंदिर जिर्णोद्धार व कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात व भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करुन दिनांक १९ व २० मे २०२२ असा दोन दिवस कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात १९ मे रोजी सकाळी ८:०० ते ८:३० वाजता दिपप्रज्वलन करून होईल.८:३० ते दुपारी १:०० गणेश पूजन,पूण्याहवाचन, प्रसाद शुध्दी, देवता स्थापना,अग्निस्थापना,संप्रोक्षण, मुख्य देवता हवन,तिर्थप्रसाद, रात्रौ ७:००ते ९:००सुस्वर भजन तर दिनांक २० मे रोजी सकाळी ८:००ते ९:०० कलश मिरवणूक,९: ते १२ कलशारोहण,ब्रम्हांडी मंडळ, देवता हवन बलिदान,पूर्णाहूती लघूरुद्र अभिषेक, गा-हाणे आरती,१२:०० ते १:०० स्वागत व मान्यवरांचे मनोगत, १:०० ते २:०० महाप्रसाद,रात्रौ ७:००ते ९:०० सुस्वर भजन तरी या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन कोळोशी ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई, स्थानिक समिती व कोळोशी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page