*💫सावंतवाडी दि.१५-:* तालुक्यातील ११ ग्रामपंचायती मधील निवडणूक मतदान प्रक्रिया आज पूर्ण झाली आहे. तालुक्यात सरासरी ७३.७९ टक्के मतदान झाले आहे. तालुक्यात सर्वात जास्त मतदान हे आरोस ग्रामपंचायतीत झाले आहे. यामध्ये कोलगाव ७९.६%, मळगाव ६८.१९ % , आंबोली ६८.३३ %, चौकुळ ६६.५३ %, तळवडे ७६.३४ %, मळेवाड ७७.३९%, दांडेली ७७ .६८%, आरोस ८८.२८ %, इन्सुली ७८.३१%, डिंगणे ७७.०३ %, आरोंदा ६६.७९ % एवढे मतदान झाले आहे. उमेदवारांचे भवितव्य आता मतपेटीत बंद झाले असून, मतदारांनी आपला कौल कोणाला दिला आहे. याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली असून, सोमवार दिनांक १८ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
सावंतवाडीतील ११ ग्रामपंचायतीसाठी ७३.७९ टक्के मतदान
