कुंकूमार्चनला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

श्री सातेरी देवीच्या वर्धापनदिनी विविध कार्यक्रम

वेंगुर्ल ता.०७-:* वेंगुर्ला येथील ग्रामदेवी श्री सातेरीच्या वार्षिक वर्धापनदिन सोहळ्या आज शनिवारपासून प्रारंभ झाला असून देवीच्या नित्यपूजेनंतर संपन्न झालेल्या कुंकूमार्चन या विधीला महिला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

गेले दोनवर्षे कोविडच्या पार्श्वभूमीवर देवीच्या वाढदिवसानिमित्त सामुहिक कार्यक्रम ठेवण्यात आले नव्हते. यावर्षी मात्र, प्रतिवर्षाप्रमाणे दोन दिवस उत्सव साजरा होत आहे. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी आयोजित केलेल्या कुंकूमार्चनला बहुसंख्येने महिलांनी उपस्थिती दर्शवित यात सहभाग घेऊन कुंकूमार्चन केले. रविवारी सकाळी श्रीसत्यनारायण महापूजा, दु. १२ वा. महाआरती, तिर्थप्रसाद, महानैवेद्य व भाविकांना महाप्रसाद, सायं.७ वा. देऊळवाडा मंडळ वेंगुर्ला यांचे भजन, रात्रौ १० वा. पार्सेकर दशावतार मंडळाचे नाटक असे कार्यक्रम होणार आहेत. तरी भाविकांनी दर्शनाचा, महाप्रसादाचा व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन सातेरी देवस्थान विश्वस्त मंडळातर्फे केले आहे.

You cannot copy content of this page