युवासेना कणकवली उपतालुकाप्रमुखपदी उत्तम लोके

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली नियुक्ती जाहीर

कणकवली ता.२८-:* कणकवली विधानसभा मतदारसंघात युवासेनेची घोडदौड सुरू असून युवासेना बळकटीकरणासाठी पदाधिकारी निवडी देखील सुरू करण्यात आल्या आहेत. कणकवली तालुक्यातील युवासेनेच्या नाटळ, हरकुळ, कळसुली विभागाकरिता युवासेनेचे उपतालुका प्रमुख म्हणून दारीस्ते येथिल उत्तम लोके यांची निवड करण्यात आली आहे.

युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते श्री. लोके यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी शिवसेना नेते सतीश सावंत, युवा सेना समन्वयक राजू राठोड, वागदे उपसरपंच रुपेश आमडोसकर, युवासेना तालुकाप्रमुख ललित घाडीगावकर, नगरसेवक कन्हैया पारकर, युवा सेना विभाग प्रमुख सिद्धेश राणे आदी उपस्थित होते. या सर्वांनीच नवनिर्वाचित युवासेना उपतालुकाप्रमुख उत्तम लोके यांना शुभेच्छा देत अभिनंदन केले.

You cannot copy content of this page