महाबळेश्वर येथून पर्यटन करून कुडाळ येथे घरी येताना घडला अपघात
*💫कुडाळ दि.१४-:* महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी गेलेल्या युवकाचे पुन्हा कुडाळ येथे आपल्या घरी येताना उत्तुर मध्ये भीषण अपघात होऊन रोहित रमाकांत कुडाळकर ( वय २२ वर्ष) हा युवक जागीच ठार झाला आहे. हा भीषण अपघात सकाळी साडे तीन वाजता घडला आहे. ओंकार वालावलकर हा युवक आपल्या भावाच्या मालकीची क्रेटा गाडी घेऊन आपले मित्र रोहन कुंभार, जगन्नाथ पेडणेकर, सायल परब व रोहित कुडाळकर असे पाच जण महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी गेले होते. पर्यटन आटपून पुन्हा कुडाळ येथे येत असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असून, या अपघातात रोहित कुडाळकर या युवकांचा जागीच मृत्यू झाला असून, इतर चार तरुण किरकोळ जख्मी झाले आहेत.
