सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त सैनिक संघाची पोलिस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
सावंतवाडी ता.२३-:* सावंतवाडी शहरात रात्री लोडशेडिंग करण्यात आल्याने नागरिकांना राग अनावर होऊन त्यांनी विज वितरणाच्या कोलगाव येथील सब स्टेशन मध्ये जाऊन तिथे कार्यरत असणाऱ्या माजी सैनिक चौरंग सावंत यांना मारहाण केल्या प्रकरणी शहरातील काही लोकांवर सावंतवाडी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आज सिंधुदुर्ग जिल्हा सेवा निवृत्त सैनिक संघाचे पदाधिकारी यांनी आज सावंतवाडीचे पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांची भेट घेऊन या प्रकरणात पूर्ण लक्ष द्यावे आणि योग्य ती कार्यवाही करुन सबंधित माजी सैनिकास योग्य तो न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त सैनिक संघाकडून करण्यात आले आहे.
