वेंगुर्लेत २७ रोजी ‘आनंद मेळावा‘

वेंगुर्ला ता.२०-:* वेंगुर्ला तालुका अंतर्गत प्राथमिक शिक्षक, शिक्षिका, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी कुटुंब निवृत्त वेतनधारक यांचा ‘आनंद मेळावा‘ २७ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत साई मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे होणार आहे.

या मेळाव्याला सिधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन कार्यकारिणीचे पदाधिकारी, तालुका शाखा वेंगुर्ल्याचे अध्यक्ष दिलीप प्रभूखानोलकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दळवी, भरत आवळे, जिल्हा सचिव सुंदर पारकर, जिल्हा सदस्य किशोर नरसुले, जिल्हा सल्लागार सुधाकर खानोलकर आदी उपस्थित राहणार आहेत. अॅड.देवदत्त परुळेकर हे ‘आनंदी वृद्धत्व‘ यावर तर सिधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष सावळाराम अणावकर हे संघटनात्मक मार्गदर्शन करणार आहेत. तसेच ७५ वर्षे वूर्ण झालेल्या सभासदांचा सन्मानही यावेळी केला जाणार आहे. तरी या आनंद मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन सिधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनचे वेंगुर्ला तालुका अध्यक्ष दिलीप प्रभूखानोलकर व सचिव राजेंद्र बेहरे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page