कलमठ कुंभारवाडी शाळेमध्ये शाळापुर्व तयारी मेळावा;सरपंच धनश्री मेस्त्री यांच्याहस्ते उद्घाटन

कणकवली ता.२०-:* कणकवली कलमठ कुंभारवाडी शाळेमध्ये शाळापुर्व तयारी मेळावा नुकताच उत्साहात झाला . सरपंच धनश्री मेस्त्री यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले . यावेळी उपस्थित मान्यवरांनी पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करत या उपक्रमाबद्दलही कौतुक केले .

यावेळी उपसरपंच वैदेही गुडेकर , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश वर्देकर , उपाध्यक्षा नम्रता नादिवडेकर , शाळा सुधार समितीचे अध्यक्ष विलास गुडेकर , गटसाधन केंद्रांच्या श्रीमती दळवी , श्रीमती पाळेकर , मुख्याध्यापक श्रीकांत बुचडे , शिक्षक मिनल खानोलकर , रमेश डोईफोडे , ऋतुजा जाधव , चित्राक्षी देसाई , किरण लाटे , अंगणवाडी सेविका अक्षता करंजेकर , मनिषा पवार , शर्मिला चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते . यावेळी दाखलपात्र मुलांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करत मेळावा आयोजनामागील उद्दीष्ट्ये विषद करण्यात आली .

तसेच मेळाव्याच्या अनुषंगाने मुलांच्या शारिरीक , मानसिक , बौद्धीक सामजिक भाषा व गणन प्रक्रिया यासंबंधीत विविध खेळांचे व कृतींचे आयोजन करण्यात आले होते . तसेच विद्यार्थ्यांचे विकास कार्ड भरण्यात आले . त्याचप्रमाणे शाळेतले पहिले पाऊल ही मार्गदर्शक पुस्तीकाही देण्यात आली . तसेच सुट्टीच्या कालावधीत मुलांकडून कोणत्या कृती व खेळ घ्यावयाचे आहेत , याबाबतही माहिती देण्यात आली .

यावेळी मान्यवरांनी शासनाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या शाळापूर्व मेळाव्यामुळे मुलांना शैक्षणिक वर्षाअगोदरच शाळेबाबत ओढ निर्माण होण्यासोबतच कृतीयुक्ती शिक्षणामुळे मुले आनंदी शिक्षणाचा लाभ घेतील , असे मनोगत व्यक्त केले . तसेच शाळेमध्ये आयोजित उपक्रम , विविध खेळ व कृतींबाबत कौतुक केले . यावेळी धनश्री मेस्त्री , गणेश वर्देकर , विलास गुडेकर यांनी विचार मांडले . ज्येष्ठ शिक्षीका मिनल खानोलकर यांनी स्वरचित या कलमठ शाळेत … हे स्वागत गीत सादर केले . प्रास्ताकि श्रीकांत बुचडे यांनी केले तर सुत्रसंचालन रमेश डोईफोडे यांनी केले .

You cannot copy content of this page