कणकवली ता.१४-:* आम.नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली तालुक्यातील वागदे गावातील नमसवाडी येथील शिवसैनिकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजन चिके,कणकवली पंचायत समिती माजी सभापती मनोज रावराणे, भाजप तालुका अध्यक्ष संतोष कानडे,मिलिंद मेस्त्री, जिल्हा बँक संचालक सौ.प्रज्ञा ढवण, शक्तिकेंद्र प्रमुख संदीप सावंत व पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपात प्रवेशकर्ते लखन घाडीगांवकर, विध्याधर घाडीगांवकर, ओंकार घाडीगांवकर, गुरुप्रसाद घाडीगांवकर, मंगेश घाडीगांवकर, अक्षय घाडीगांवकर, तानाजी घाडीगांवकर, महेंद्र घाडीगांवकर, अभिषेक घाडीगांवकर, घनश्याम घाडीगांवकर, अंकित घाडीगांवकर, संजय घाडीगांवकर यांचे यावेळी स्वागत करण्यात आले.
