कणकवली ता.१४-:* कोल्हापूर जिल्ह्यातील सोळांकुर गावामध्ये समस्त बौद्ध महासंघ यांच्यावतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी कणकवली येथील जेष्ठ वसामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र मनोहर पेडणेकर उपस्थित होते. सोबत अर्थव रविकांत पिळणकर उपस्थित होते.
यावेळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नतमस्तक झाले.यावेळी साळांकुर परिसरातील समस्त बौद्ध अनुयायी उपस्थित होते. उपस्थित बांधवांनी राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले.
