सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

सावंतवाडी ता.१४-:* भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तालुका कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. व त्यानंतर सावंतवाडी समाज मंदिर येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला.

याप्रसंगी पुष्पहार अर्पण करताना शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर युवती जिल्हाध्यक्ष सौ सावली पाटकर, जिल्हा उपाध्यक्ष आसिफ शेख, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग-व्यापार हिदायतुल्ला खान, तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल, अल्पसंख्यांक व जिल्हा उपाध्यक्ष इफ्तेकार राजगुरू, महिला तालुकाध्यक्ष सौ रिद्धी परब, उद्योग-व्यापार तालुका उपाध्यक्ष याकुब शेख, तालुका उपाध्यक्ष काशिनाथ दुभाषी, राकेश योगी, नंदकिशोर नाईक, कौस्तुभ नाईक आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page