बहुजन समाजाला मदत म्हणजे फुलेंच्या कार्यास हातभार – प्रा.आरोलकर

वेंगुर्ला ता.१२-:* महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अथक परिश्रमातून झाली. त्यामुळे आज असंख्य स्त्रीया सर्वच क्षेत्रात उत्तुंग यश संपादर करीत आहेत. बहुजन समाजातील मुलींना आणि स्त्रीयांना शिक्षणामध्ये मदत करणे हे महात्मा जोतिबा फुले यांच्या कार्यास हातभार लावण्यासारखे होईल असे मत समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा.देविदास आरोलकर यांनी व्यक्त केले. बॅ.खर्डेकर महाविद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

ज्योतिबा फुले यांनी समाजातील अनेक चुकीच्या प्रथा परंपरांना आळा घातल्याने त्या अनिष्ठ प्रथा आज कमी होताना दिसत असल्याचे प्रा.डॉ.सुनिल भिसे यांनी तर ‘शेतक-यांच्या आसुड‘ या ग्रंथाद्वारे महात्मा फुले यांनी आवाज उठविला. त्यामुळे ब्रिटीशांना अन्यायकारक शेतसारा कमी करावा लागला हे त्यावेळचे मोठे यश असल्याची माहिती प्राचार्य विलास देऊलकर यांनी दिली. या कार्यक्रमाला कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक डी.जे.शितोळे, प्रा.डॉ.व्ही.एम.पाटोळे, प्रा.के.आर.कांबळे आदी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्याक्रमांतर्गत घेतलेल्या निबंध स्पर्धेतील सायली कुडपकर, चैताली पवार, सानिका करंगुटकर यांना मान्यवरांच्या हस्ते याच कार्यक्रमात गौरविण्यात आले. सांस्कृतिक विभाग प्रमुख वेदिका सावंत यांनी सूत्रसंचालन तर प्रा. वामन गावडे यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page