कणकवली ता.०९-:* खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान संचालक व शेठ न.म.विद्यालय खारेपाटणचे सहाय्यक शिक्षक राजेश पांडुरंग वारंगे यांना नुकताच श्री नागूयेश महारुद्रा भजनी मंडळ, गोवा ऐनबोल असोसिएशन महाराष्ट्र, व जे वन मीडिया नाशिकच्यावतीने दिला जाणारा राष्ट्रीय स्तरावरील ग्लोबल टुरिझम समीटअवाॅर्ड त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी जाहीर झाला आहे.
खारेपाटण हायस्कुलचे शिक्षक राजेश वारंगे हे शैक्षणिक सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असून, नडगिवे ग्रामपंचायतीचे ते सरपंच राहिलेले आहेत. त्यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायतीस महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. शेठ न.म. विद्यालय खारेपाटण येथे सन् 2000 सालापासून ते सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांचे अनेक विद्यार्थी आज देश-विदेशात मोठ्या पदावर कार्यरत आहेत.
खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विकासात एक विश्वस्त म्हणून त्यांची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष प्रवीण लोकरे उपाध्यक्ष भिकाजी कर्ले, सचिव महेश कोळसुलकर, सहसचिव आत्माराम कांबळे, संचालक विजय देसाई, खजिनदार संदेश धुमाळे, मुख्याध्यापक प्रकाश अकीवाटे, पर्यवेक्षक संजय सानप, तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदर पुरस्काराबद्दल राजेश वारंगे यांचे अभिनंदन केले आहे. व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या पुरस्काराचे वितरण पणजी (गोवा) येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
