शिवसेना व गाव पॅनेल प्रणित सहकार समृद्धी पॅनेलचा एकतर्फी विजय
कणकवली ता.०६-:* कणकवली तालुक्यातील हळवल येथील शिवराई रवळनाथ विविध कार्यकारी सहकारी सेवा संघ संस्था मर्यादित हळवल सोसायटीवर शिवसेना व गाव पॅनेल प्रणित सहकार समृद्धी पॅनेलचा एकतर्फी विजय झाला आहे. १२ जागांवरती विजय मिळवत सहकार समृद्धी पॅनलने सहकार संस्थेवर शिक्कामोर्तब केले आहे. विद्यमान चेअरमन राजेंद्र राणे यांच्या नेतृत्वाखाली झालेली ही निवडणूक जिंकत समृद्धी पॅनेलने भाजप प्रणित पॅनलचा एकतर्फी पराभव केला आहे.
आमदार वैभव नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तेजस राणे यांनी हळवल येथे भेट देत राजू राणे व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. तब्बल ५१ वर्षांनी झालेल्या या निवडणुकीत राजू राणे यांनी आपले वर्चस्व कायम ठेवत पुन्हा एकदा शिवराई रवळनाथ सोसायटीवर विजय मिळवला आहे. याबद्धल सर्व कार्यकर्त्यांनी उचलून घेत त्यांचे अभिनंदन केले. या निवडणूकित राजू राणे, सुभाष राणे, जनार्दन डोबकर, संदीप गुरव ,राजश्री परब ,शर्वरी राणे ,प्रकाश घोगळे, विष्णू ठाकूर ,मिलिंद जाधव , गणेश राणे ,पंढरी राणे ,जयसिंग राणे, भोगजी राणे हे विजयी झाले आहेत.
