दिवंगत बौद्धांचार्य प्रकाश जाधव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या सावंतवाडीत शोकसभेचे आयोजन…

सावंतवाडी ता.०५-:* शाहू, फुले आणि आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते दिवंगत बौध्दाचार्य प्रकाश जाधव यांचे नुकतेच निधन झाले असून, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बुधवार दिनांक 5 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता सावंतवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे. या श्रद्धांजली कार्यक्रमासाठी सर्व धम्म बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण निगुडकर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सावंतवाडी प्रेरणाभूमी संवर्धन समितीचे मोहन जाधव यांनी केले आहे.

You cannot copy content of this page