सावंतवाडी ता.०४-:* कारिवडे येथील मुख्य रस्त्यालगत एका कोसळलेल्या विहिरीत तीन फूट मगर मृतावस्थेत आढळून आली हा प्रकार आज सकाळच्या सुमारास उघडकीस आला त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्या मगरीला बाहेर कडून येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले याबाबत वनखात्याला माहिती मिळताच वनपाल प्रमोद सावंत, वनरक्षक सागर भोजने, वनमजूर दिलीप काळसेकर घटनास्थळी तात्काळ दाखल झाले यावेळी कारिवडे माजी उपसरपंच आपा परब, संजय गावकर आदी उपस्थित होते.
आज सकाळच्या सुमारास करिवडे येथील मुख्य रस्त्यालगत एका कोसळलेल्या विहिरीत तीन फूट मगर मृतावस्थेत आढळून आली विहिरीत मृत मगर असल्याचे निदर्शनास येताच एकाच खळबळ उडाली होती मात्र जंगलमय भागात या मगरी आल्या कुठून असा प्रश्न निर्माण होत होता या विहिरीत काही दिवसापूर्वी एक मोठी मगर अनेकवेळा वाहनचालकांच्या दृष्टीस पडली होती पावसाळ्यात नजीकच्या ओहोळातून या मगरी आल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले यानंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ठाकूर यांनी शवविच्छेदन केल्यानंतर येथील उपरल स्मशानभूमीत या मगरीवर अंत्यसंस्कार करण्यात आले
