सावित्रीबाई फुले यांचे कार्य समाजासाठी आदर्शवत!

मुख्या. शुभांगी लोकरे- खोत यांचे प्रतिपादन

*💫मालवण दि.११-:* सावित्रीबाई फुले यांच्या चळवळीतून मुलींना शिक्षणाची द्वारे खुली झाल्याने आज समाजात सावित्रीच्या लेकी म्हणून आपण महिला मानाने जगत आहोत. सावित्रीबाई फुले हे समस्त महिला वर्गासाठी नव्हे तर संपूर्ण समाजासाठी आदर्शवत व्यक्तिमत्व होते. या व्यक्तिमत्त्वाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने वाटचाल करावी असे प्रतिपादन मुख्याध्यापिका सौ. शुभांगी लोकरे- खोत यांनी येथे केले. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्त येथील भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे महिला शिक्षण दिन साजरा करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी किशोर देउलकर, गौतमी प्रभुगावकर, पार्वती कोदे, संजना प्रभुगावकर, रेश्मा बोरकर, सायली म्हाडगूत, सिस्टर ख्रिस्ती, स्वरांजली ठाकूर, रंजनी सावंत, वसंत प्रभुगावकर, सौ. करुणा चव्हाण, सौ प्रिया पाटकर तसेच विध्यार्थी उपस्थित होते. यावेळी मनस्वी पेडणेकर या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारली होती.

You cannot copy content of this page