त्या रस्त्यावरून वाहतुकीवेळी दुर्घटना झाल्यास संबंधित विभाग राहणार जबाबदार – गुरुदास गवंडे

*💫सावंतवाडी दि.११-:* तहसीलदार यांच्या आदेशानुसार सोनुर्ली, इन्सुली, वेत्ये आदी गावातील दगड खाणीतील स्फोटांमुळे निगुडे गावातील १५६ घरांना तडे गेले आहेत. सोनुर्ली निगुडे मार्गावरून दिवस रात्र काळा दगडाची ओव्हर लोड वाहतूक केली जात आहे. यावर कारवाई करण्यासाठी निगुडे ग्रामपंचायतीने वारंवार तहसीलदार व उपप्रादेशिक परिवहन सिंधुदुर्ग यांना तक्रारी करून देखील त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. आज गावात पंचयादी घालत असताना ही होणारी वाहतूक तहसीलदार म्हात्रे यांच्या आदेशानुसार मडूरा मंडळ अधिकारी अशोक पवार यांनी रोखून त्यांना समज दिली आहे. तसेच पर्यायी मार्गाने वाहतूक करण्यास सांगून, इथून पुन्हा वाहतूक केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल असे देखील सांगितले आहे.भविष्यात या वाहतुकीमुळे कोणतीही दुर्घटना झाल्यास याला संबंधित विभाग जबाबदार राहणार असून, यावर कारवाई न झाल्यास आरटीओ समोर मनसे तीव्र आंदोलन करेल असा इशारा मनसे तालुकाध्यक्ष तथा निगुडे गावचे उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page