नांदगांव येथील मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित निबंध स्पर्धेच पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

कोरोना जनजागृती विषयी निबंध स्पर्धा होणे कौतुकास्पद – हर्षदा वाळके

*💫कणकवली दि.११-:* कणकवली तालूक्यातील नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट च्या प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या गाव पातळीवरील कोरोना या विषयावरील निबंध स्पर्धेचा निकाल जाहिर करण्यात पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला यात ५ वी ७वी माझे कुटूंब माझी जबाबदारी या गटात जि.प.केंद्र शाळा नांदगाव नं.१ ची कु.राधिका प्रशांत बिडये तर ८ वी ते १० वी कोरोना संकट नव्हे जनजागृती साठी प्रथम क्रमांक सरस्वती हाय.नांदगावची कु.धनश्री प्रशांत बिडये ९ वी (अ) हीने क्रमांक पटकाविला आहे. यासाठी ५ वी त ७ पर्यंत विद्यार्थ्यांना (१५० शब्द कमाल मर्यादा) कोरोना पार्श्वभूमीवर माझे कुटूंब माझी जबाबदारी असा विषय ठेवण्यात आला होता .यामध्ये प्रथम – जि.प.केंद्र शाळा नांदगाव नं.१ ची कु.राधिका प्रशांत बिडये इ.पाचवी, व्दीतीय- सरस्वती हाय.नांदगावची कु. करिना कृष्णा मोरये ७ वी ,तृतीय सरस्वती हाय.नांदगावचा कुमार जैद सादीक काझी ६ वी तर उत्तेजनार्थ सरस्वती हाय.नांदगावची कु. गंधर्वी दिपक मोरजकर ६ वी व जि.प.केंद्र शाळा नांदगाव नं.१ ची कु.आलिया आसिफ साटविलकर इ.६ वी तर माध्यमिक ८ वी ते १० वी पर्यंत विद्यार्थ्यांसाठी (२५० शब्द कमाल मर्यादा) कोरोना : संकट नव्हे जनजागृती असा विषय ठेवण्यात आला होता.यामध्ये प्रथम सरस्वती हाय.नांदगावची कु.धनश्री प्रशांत बिडये ९ वी (अ) व्दीतीय सरस्वती हाय.नांदगावची सुहानी सचिन तांबे ९ वी (अ)तर उत्तेजनार्थ सरस्वती हाय.नांदगावची मुक्ती शांताराम जंगले बिडये ९ वी (अ) या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले असून यांचे पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. विजेत्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले यावेळी कवी अजय कांडर,मधूकर मातोंडकर, नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, पंचायत समिती सदस्य हर्षदा वाळके वैद्यकीय अधिकारी डॉ रावराणे , ग्रामविस्तार अधिकारी हरमळकर,ट्रस्ट अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर, उपाध्यक्ष नारायण मोरये निबंध स्पर्धा विजते ,पालक उपस्थित होते.

You cannot copy content of this page