मनसेतर्फे बांद्यात शिवजयंती साजरी

तालुकाध्यक्ष गुरूदास गवंडे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास केले अभिवादन

बांदा ता.२१-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने बांदा येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी उपस्थित सर्वांना मिठाई वाटप करण्यात आले.

तसेच ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’ च्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी उपजिल्हाध्यक्ष दत्ताराम गावकर, बांदा विभागीय अध्यक्ष अंकुश सावंत, उपतालुकाध्यक्ष सुधीर राऊळ, विष्णू वसकर, मळगाव शाखाअध्यक्ष राकेश परब, रोनापाल शाखाध्यक्ष प्रज्वल गावडे, निरवडे शाखाध्यक्ष प्रशांत निरवडेकर, विलवडे शाखाध्यक्ष श्रीराम सावंत, उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षीप्रमाणे राज्यात आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती जोरदार साजरी केली जात आहे. मनसे नेते व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांनी सकाळी ६.३० वाजता महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी (ता. जुन्नर, पुणे) येथे अभिषेक व पूजन केले. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, नेते अमित ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. मनसेतर्फे महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page