वैभववाडीत पोलिस ‘रेझिंग डे’ सप्ताह संपन्न…!

*💫वैभववाडी दि.०८-:* वैभववाडी पोलिस ठाण्याच्यावतीने ‘पोलिस रेझिंग डे’ निमित्त कोकिसरे येथील माधवराव पवार विद्यालय,वैभववाडी बस स्टँड व बाजारपेठेतील नागरिकांना कोव्हिड विषयक मार्गदर्शन करण्यात आले._ राज्यात दरवर्षी २ जानेवारी ते ८ जानेवारी दरम्यान ‘रेझिंग डे ‘ साजरा केला जातो.वैभववाडी पोलीस ठाण्याच्या वतीने याच अनुषंगाने रेझिंग डे साजरा करण्यात आला. यावेळी मास्कचा वापर करा,सोशल डिस्टंसिंगचे पालन करा,हात वारंवार साबण आणि पाण्याने धुवा,गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, असे आवाहन करण्यात आले.वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्यासह वैभववाडी पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते. कोकिसरे येथील माधवराव पवार विद्यालयातील विदयार्थ्यांनीही पोलिसांसोबत नागरिकांना आवाहन केले.

You cannot copy content of this page