राष्ट्रवादीच्या मोफत ई श्रम कार्ड आणि युनिव्हर्सल पास शिबिराची घराघरात जाऊन जनजागृती….

सावंतवाडी ता.११-:* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी शहरात ‘मोफत ई- श्रम कार्ड नोंदणी आणि मोफत युनिवर्सल पास’ची मोफत सुविधा शहरातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून शहरात घरोघरी याबाबतची माहिती देत जनजागृती करण्यात आली. १९ मार्च ते २७ मार्च पर्यंत स. १० ते सायं. ५ वाजेपर्यंत श्रद्धा सदन उभाबाजार सावंतवाडी इथं ही सुविधा उपलब्ध असणार असून शहरवासीयांना मोफत ई- श्रम कार्ड नोंदणी आणि मोफत युनिवर्सल पास’ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, उपाध्यक्ष संतोष जोईल, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तेकार राजगुरू, युवक तालुकाध्यक्ष अर्षद बेग,युवक विधानसभा अध्यक्षा कौस्तुभ नाईक, युवक शहराध्यक्ष मयुरेश मुळीक, आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page