अन्नमहोत्सवाचे उपनगराध्यक्ष देवीदास गवस यांच्या हस्ते उद्घाटन

दोडामार्ग ता.११ सुमित दळवी-:* दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई हळबे महाविद्यालयाच्या अध्ययावत विस्तार विभागाच्या अन्नमहोत्सवाचे उद्घाटन कसई दोडामार्ग नगरपंचतीचे उपनगराध्यक्ष देवीदास गवस यांचे हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत, नगरसेवक प्रा. संजय खडपकर, हॉटेल मैनेजमेंट विभागाचे प्रा.गौरेश कर्पे,आजीवन विस्तार विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. सोपान जाधव प्रा. श्रीपाद पागोवर तसेच महाविद्यालयाचे इतर प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी उपनगराध्यक्ष यांनी विद्यार्थ्याला भावी आयुष्यात यशस्वी होण्यासणी महोत्सवाची गरज असल्याचे विशद केले.भविष्यात विद्यार्थी अशा उपक्रमामुळे रोजगार आपणच उभा करून स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थी आपणच घरात केलेले विविध पदार्थांचे प्रदर्शन करून विक्री केली.परीक्षक म्हणून महाविद्यालयाचे प्रा. गौरेश कर्पे व प्रा योगेश ठाकुर यांनी परीक्षण केले सुत्रसंचालन प्रा. डॉ. सोपान जाधव तर आभार प्रा श्रीपाद पाडगांवकर यांनी केले.

You cannot copy content of this page