डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने स्वच्छता अभियान

कणकवली ता.०१-:* महाराष्ट्र भुषण डॉ. श्री. नाना साहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,रेवदंडा. यांच्या वतीने रंजलेल्या – गांजलेल्या अखिल मानवी समाजाला निरुपणाच्या माध्यमातून सदाचारी, व्यसनमुक्त, सबळ, चैतन्यमय, प्रयत्नशील बनविण्याचे कार्य १९४३ सालापासुन डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी, डॉ.श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी व त्याचा वारसा डॉ.श्री.सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली निष्कामतेने अविरत चालू आहे.

अध्यात्मिक विकासाबरोबरच समाजाच्या, देशाच्या ऋणातुन मुक्त होण्यासाठी रक्तदान, वृक्षारोपण अभियान, पाणवठे स्वच्छता अभियान, जेष्ठ नागरिक दाखले, वय- अधिवास दाखले अभियान, सार्वजनिक ठिकाणे – स्मशानभुमी स्वच्छता, बसस्थानके, रेल्वे स्टेशन , शासकीय कार्यालय परिसर स्वच्छता अभियान राबवले जातात.गरजवंत विद्यार्थांना शालोपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात येते.कोणत्याही आपत्ति च्या वेळी शासकीय यंत्रणाच्या सोबतीने मदत कार्य करण्यासाठी नेहमीच प्रतिष्ठान अग्रेसर असते मग कोल्हापुर पुरस्थिती असो वा चिपळूण पुर स्थिति असो सर्वत्र प्रतिष्ठान निष्कामतेने कार्य करत असते.

अध्यात्मिक व सामाजिक कार्य सातासमुद्रापार पोहचले असुन या कार्याची दखल बॅंकाॅक विद्यापीठाने घेतली असुन मानद डॉक्टरेट ही पदवी महाराष्ट्र भुषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी याचे अध्यात्मिक व सामाजिक कार्याचे वारसदार डॉ.श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांना नुकतीच प्रदान करण्यात आली आहे.

महाराष्ट्र भुषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक १ मार्च २०२२ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण चिवला बीच, ओरोस फाटा ते मुख्यालय, कासार्डे हायस्कुल परिसर, आडेली कांबळेवीर स्मशानभुमि, वेंगुर्ले – देवगड बस स्थानक, बांदा स्मशान भुमि, जिल्हा पशुचिकित्सालय जानवली येथे स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते. या अभियानात सर्व ठिकाणी मिळून ७९५ सदस्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन २३ टन कचरा गोळा करण्यात आला.

You cannot copy content of this page