पळसंब येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी….!

विविध मालवणी कवितांचे करण्यात आले सादरीकरण

*💫मालवण दि.०४-:* आज स्त्रिया ज्यांच्यामुळे मोकळा श्वास घेतात त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले य या अलौकिक व्यक्तित्वाचे स्मरण करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे .या निमित्ताने शाळा पळसंब नं १ ने महिला शिक्षण दिनाचे आयोजन श्री .चिदरकर याच्या घरी केले होते होते. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेसमोर कोमसाप सदस्या अनुराधा आचरेकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व त्रिबक हायस्कुलच्या बागवे मॅडम याच्या हस्ते पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यावेळी पळसंब सरपंच चद्रकांत गोलतकर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री . रविकांत सावंत, मुख्याध्यापक सौ . असरोडकर मॅडम ,सौ . पवार मॅडम , निकीता पुजारे , श्री.चिदरकर , सौ .शुभागी सांवत ,शिक्षक स्वयंसेवक , मुले उपस्थित होते , तसेच पळसंब गावामध्ये पहिल्या महिला पोस्टमन म्हणून सेवा दिलेल्या निकिता पुजारे हिचा आणि प्रमुख उपस्थिताचा सत्कार सरपंच याच्या हस्ते करण्यात आला , त्यावेळी उपस्थित मान्यवराचे महिलावर्गाचे सरपंच यानी आभार मानले. साहित्यिक अनुराधा आचरेकर यांनी आपल्या मालवणी कवीता सादर केल्या. तर बागवे मॅडम यानी सावित्रीबाई फुले यांच्या विषयी मोलाच मार्गदर्शन केले , कार्यक्रमाचे सूत्रसचालन पवार मॅडम , तर आभार असरोडकर मॅडम यांनी मानले

You cannot copy content of this page