Headlines

समाजकल्याण निरीक्षक केरबा पारदोळे यांची गृहपालपदी पदोन्नती

*⚡ओरोस ता.२१-:* सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील समाजकल्याण निरीक्षक केरबा पारदोळे यांची कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथील शासकीय मुलांचे वस्तीगृह येथील गृहपाल पदावर पदोन्नती झाली. सहायक आयुक्त दीपक घाटे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून त्यांना पुढील कार्यभारासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी सहायक लेखाधिकारी भालचंद्र कापडी, समाज कल्याण निरीक्षक सुनील बागुल, धनलत्ता चव्हाण, संतोष परुळेकर, रवी जाधव, चित्रांगी तोरस्कर, शिल्पा आम्रे, सृष्टी रेवाळे, आरती सावंत, धोंडी कलिंगण, प्रकाश गोसावी, संदेश कसालकर आदींनीही शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page