*💫कुडाळ दि.०२-:* माणगाव येथे काही दिवसापूर्वी घरात कोणी नसल्याची संधी साधत सौ. अनुराधा खरवंडे यांच्या घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेसह सुमारे १ लाख ९२ हजाराचा मुद्देमाल चोरीस गेला होता. याप्रकरणी एल सी बी ने आज धडक कारवाई करत सावंतवाडी बस स्थानकावरून आज सकाळी १० च्या सुमारास त्या आरोपीला अटक केली आहे. त्या आरोपींनी गुन्ह्याची कबुली देखील यावेळी दिली आहे. ही कारवाई एल सी बी चे प्रमोद काळसेकर, सुधित सावंत, अनिल धुरी, रवींद्र इंगळे, बाळू पालकर, प्रकाश कदम, वालावलकर, शेळके आदींनी ही कारवाई केली आहे.
माणगाव चोरी प्रकरणी आरोपीस एल सी बी कडून अटक
