वैभववाडी तालुक्यात २३६ पैकी २३४ अर्ज वैध

वैभववाडी : वैभववाडी तालुक्यात होऊ घातलेल्या १३ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी १०३ जागांसाठी दाखल केलेल्या २३६ पैकी २३४ अर्ज वैध ठरले आहेत. तर २ अर्ज अवैध ठरले आहेत. वैभववाडी तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी होऊ घातल्याआहेत. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर होती. यात १३ ग्रामपंचायतीसाठी असलेल्या १०३ जागांसाठी तब्बल २३६ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर गुरुवारी प्राप्त अर्जावर छाननी प्रक्रिया पार पडली. यावेळी कोकिसरे ग्रामपंचायतीचा एक व वेंगसर ग्रामपंचायतीचा एक अर्ज असे दोन अर्ज अवैध ठरविण्यात आला. तर उर्वरीत २३४ उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले. आता ४ जानेवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून यामध्ये कोण कोण उमेदवारी अर्ज मागे घेतो आणि कोण रिंगणात राहतो हे चित्र स्पष्ट होणार आहे.

You cannot copy content of this page