सिंधुदुर्ग संघाचे नेतृत्व केलेल्या राधिका घाटये हिचा ग्रामपंचायत तळवणेतर्फे सत्कार
*💫सावंतवाडी दि.३१-:* नाशिक येथे झालेल्या जिल्हास्तरीय महिला क्रिकेट स्पर्धेत सिंधुदुर्ग संघाने तृतीय क्रमांक मिळविला. राधिका नारायण घाटये हिने या संघाचे कर्णधारपद भूषविले. सिंधुदुर्गच्या या महिला संघाने मिळविलेल्या या यशामुळे सर्वत्र या टीमचे कौतुक होत असून राधिका घाटये हिचा ग्रामपंचायत तळवणेतर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी पंचायत समिती. उपसभापती संदीप नेमळेकर, तळवणे सरपंच वैभवी रेडकर, उपसरपंच समीर केरकर, ग्रामपंचायत सदस्य दत्ताराम बर्डे, प्रणिता पेडणेकर, प्रतिक्षा गावडे, संजय गावडे, विनय पालव, संतोष गावडे, तलाठी भिंगारे, पप्या घाटये, अशोक घाटये, प्रविण बर्वे आदी उपस्थित होते. कप्तानपद भूषविलेली राधिका घाटये हि तळवणे गावची असून तिच्या या यशामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
