सुकळवाड येथील श्री ब्राम्हण देवाचा जत्रोत्सव १ जानेवारी रोजी…

सिंधुदुर्गनगरी ता ३० सुकळवाड येथील श्री ब्राम्हणदेवाचा वार्षिक जत्रोसव १ जानेवारी २०२१ रोजी होत आहे या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमासह रात्री १० वाजता विविध गटातील क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे. प्रतिवर्षि प्रमाणे सुकळवाड येथील श्री ब्राम्हणदेवाचा वार्षिक जत्रोसव १ जानेवारी रोजी होत असून या निमित्त सकाळ पासून ओटया भरणे व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री ब्राह्मण देवाच्या जत्रोत्सवानिमित्त २३ डिसेंबरपासून विविध गटातील क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील विजेत्या संघांना जत्रोसवमध्ये रात्री १० वाजता आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रमात बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यानंतर पार्सेकर दशावतार नाट्य मंडळा चे नाटक होणार आहे. तरी भाविकांनी आणि क्रिकेट रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री ब्रम्हणदेव सेवा समिती व श्री ब्राम्हणदेव क्रीडा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page