छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना प्रकाराचा मराठा समाजाने केला निषेध

*⚡कणकवली ता.२०-:* कर्नाटक येथे काही अज्ञात व्यक्तीकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली असून या पुतळा विटंबना करणाऱ्यांचा निषेध मराठा समाज कणकवली यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आला यावेळी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालत मराठा समाज कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला.

यावेळी मराठा समाजाचे बबलू सावंत, सुशील सावंत, सुशांत दळवी , बच्चू प्रभुगावकर, भाई परब ,महेंद्र सांब्रेकर, लवू परब,पप्पू पुजारे,शिवा राणे, भाऊ सावंत, समीर प्रभुगावकर, सर्वेश दळवी,स्वप्नील चिंदरकर,समीर परब, संदीप चव्हाण, संजय साळसकर बंटी सावंत व अन्य उपस्थित होते. कर्नाटक येथे काही अज्ञात व्यक्तीकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा झालेला प्रकार अत्यंत निषेधार्थ आहे.

महाराष्ट्राचे आणि मराठा समाजाची अस्मिता असलेल्या छत्रपति शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार हा कर्नाटकसाठी लांछनास्पद प्रकार आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडल्यास शिवप्रेमी नागरिक पेटून उठतील अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

You cannot copy content of this page