सैनिक पतसंस्था वेंगुर्ला शाखेतर्फे रावत यांना श्रद्धांजली

*⚡वेंगुर्ला ता.२०-:* तामिळनाडूतील कुन्नुर येथे झालेल्या भिषण दुर्घटनेत भारताचे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत व त्यांच्या पत्नी यांच्यासह १३ जण मृत्युमुखी पडले. या सर्वांना सैनिक पतसंस्था वेंगुर्ला शाखेतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी शाखेचे संचालक बाळकृष्ण मुणगेकर, शुभांगी गावडे, माजी सैनिक कॅप्टन प्रताप राणे, हवालदार देवेंद्र गावडे, माजी सैनिक रघुनाथ परब यांची पत्नी सरोज परब, अन्नपूर्णा तांडेल, शाखा व्यवस्थापक ज्योति देसाई, कर्मचारी नितीन बेहेरे, शंकर दिपनाईक, ज्योति वडर, प्रदिप दाभोलकर, दत्तप्रसाद तांडेल व पिग्मी एजंट सुजय गावकर उपस्थिती होते. कॅप्टन श्री. राणे व हवालदार श्री.गावडे यांनी रावत यांच्या कार्याची माहिती देत आपल्या सैनिकी जीवनातील आठवणींना उजाळा दिला.

You cannot copy content of this page