सावंतवाडी प्रांत, तहसीलदार यांची उपस्थिती
*⚡सावंतवाडी ता.२०-:* सावंतवाडी प्रांत विभागाच्यावतीने (सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग) कोंडुरा तिठा येथील पारिजात सभागृहात शनिवारी पोलीस पाटील दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे उपस्थित होते. कार्यक्रमाचे उदघाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर सावंतवाडी तालुकाध्यक्ष विलास साटेलकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष संजय गवस, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष मधुसूदन मेस्त्री, आरोस सरपंच शंकर नाईक, अमोल आरोसकर आदी उपस्थित होते. यावेळी आदर्श पोलीस पाटील पुरस्कार प्राप्त निर्जरा परब (रोणापाल) व माजी ज़िल्हाध्यक्ष यशवंत सावंत (डिंगणे) यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थित पोलीस पाटीलांना प्रांताधिकारी पानवेकर व तहसीलदार म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले. पानवेकर यांनी कोणकोणते दाखले देताना अडचण येते त्यांची सूची दिल्यास आपण त्या त्या विभागाशी बोलून समस्या सोडवू, असे आश्वासन दिले.
तसेच गावपातळीवर येणाऱ्या समस्यांबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला माजी उपसभापती संदीप नेमळेकर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आरोस, दांडेली, इन्सुली, कारिवडे, ओटवणे, चराठे, माजगाव पोलीस पाटीलानी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मडुरा पोलीस पाटील यांनी, तर आभार झरेबांबर पोलीस पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाला तिन्ही तालुक्यातील ७८ पोलीस पाटील उपस्थित होते.
