मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुक्यातील आडवली गावातील श्री देव रवळनाथ मंदिरातील फंडपेटी फोडून अज्ञात चोरट्यांनी चार हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना दि २ डिसेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत घडली आहे याबाबतची तक्रार आचरा पोलीस ठाण्यात भार्गव वामन लाड यांनी दिली आहे मालवण तालुक्यातील आडवली येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री देव रवळनाथ मंदिरात भार्गव वामन लाड हे शुक्रवारी सकाळी देवदर्शना साठी गेले असता त्यांना गाभाऱ्यात असलेली फंडपेटी फोडलेल्या अवस्थेत असलेली आढळून आली व त्यात रक्कम नसल्याचे निदर्शनास आले या घटनेची माहिती त्यानी आचरा पोलिसांना दिली घटनेची महिती मिळाल्यानंतर आचरा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांनी घटनास्थळी जात पहाणी केली. आडवली गावातील श्रीदेव रवळनाथ मंदिरात नुकताच धार्मिक कार्यक्रम झाला होता या कार्यक्रमात भाविकांनी मोठया प्रमाणात उपस्थितीती लावल्याने फंडपेटीत रक्कम जमा झालेली होती या फंडपेटीतील सुमारे चार हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यानी लंपास केली असून या बाबत आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील करत आहेत दरम्यान, या घटनेनंतर पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांनी पोलिस पाटील यांची बैठक घेत महत्वाच्या सूचना केल्या असून मंदिरातील फंडपेटीतील रक्कम दीर्घकाळ आत न ठेवता वेळोवेळी काढून सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन त्यानी संबंधित मंदिरांच्या पुजारीना केले आहे
श्री देव रवळनाथ मंदिरातील फंडपेटी अज्ञाताने फोडली…
