मालवण दि प्रतिनिधी विद्यार्थ्यांमध्ये शोधन वृत्ती जागून त्यातून शास्त्रज्ञ निर्माण होण्याच्या दृष्टिने भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागामार्फत ,अखिल भारतीय बालविज्ञान परीषदेने घेतलेल्या विज्ञान संशोधन प्रकल्प स्पर्धेत मालवणच्या भंडारी ए सो हायस्कूलच्या पूर्वा शिवराम परब, कृती राजेश गोसावी, मंथन दत्तात्रय करलकर या तीन विद्यार्थ्यांचे संशोधन प्रकल्प जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाले आहेत भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागामार्फत अखिल भारतीय बालविज्ञान परीषदेने विज्ञान संशोधन प्रकल्प स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेत भंडारी ए.सो. हायस्कूल , मालवण या प्रशालेतील सात विद्यार्थ्यांनी आपले विविध विषयांवरील संशोधन प्रकल्प तयार करून सादर केले. या प्रकल्पाचा विषय व एकंदरीत प्रकल्प कसा करणार यांच्या सादरीकरणाची स्पर्धा होवून यातील तीन प्रकल्पांची निवड करण्यात आली. त्यामध्ये पूर्वा शिवराम परब हिने सादर केलेल्या पारंपरिक ज्ञानाचा पडताळा करून योग्य धान्य रक्षक शोधणे तर कृती राजेश गोसावी हिने सादर केलेल्या मिरी या मसाला पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी अभ्यास करून पर्यावरण पूरक पद्धत विकसित करणे तसेच मंथन दत्तात्रय करलकर या विद्यार्थ्यांने तयार केलेला पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत तयार करून त्याची उपयुक्तता तपासणे या तीन विषयावरील प्रकल्पाची निवड समितीने निवड केली या तीन विषयांची जिल्ह्यास्तरावर निवड झाली असून या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर ,चेअरमन सुधीर हेरेकर, मुख्याध्यापक व्हि जी खोत व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे
विज्ञान संशोधन प्रकल्प स्पर्धेत भंडारी हायस्कूलच्या तीन विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाची निवड
