*शहरातील विकास कामांची भूमिपूजन आपल्याच हस्ते होणार

*शिवसेनेच्या माध्यमातून डीपीडीसी मधून विकास कामांसाठी मंजूर झालाय निधी

*पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केले स्पष्ट*

*💫सावंतवाडी दि.२६-:* खासदार विनायक राऊत, माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांनी जिल्ह्यातील नागरिकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपण करत असल्याचे मत आज सावंतवाडी येथे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे. यावेळी माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांनी सावंतवाडी तालुक्यासाठी डीपीडीसी मधून ११ कोटी निधी विकास कामासाठी मंजूर केला असून, या सर्व विकास कामांची उद्घाटन खासदार विनायक राऊत, आमदार दिपक केसरकर आणि आपल्या हातून होणार असे त्यांनी आज सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. शासकीय भूमिपूजन करताना राजकीय शिष्टाचार पाळणे गरजेचे असल्याचे पण ते म्हणाले आहेत.

You cannot copy content of this page