मडुऱ्यात 3 रोजी किसान क्रेडिट कार्ड संदर्भात पशुपालकांची बैठक

बांदा ता.३०-: शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजने संदर्भात आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी मडुरा विविध सहकारी सोसायटीच्या सभागृहात सर्व दूध उत्पादक पशुपालक तसेच मत्स्यव्यावसायिकांसाठी 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. जास्तीत जास्त पशुपालकांनी उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन सावंतवाडी पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी यांनी केले आहे. मडुरा पंचक्रोशीतील सर्व दूध उत्पादक पशुपालक तसेच मत्स्यव्यावसायिक यांना किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत योजनांची माहिती व्हावी आणि या योजने अंतर्गत लाभाकरीता आवश्यक कागदपत्रे पूर्तता याबाबतची माहिती बैठकीत देण्यात येणार आहे. या योजनेकामी तालुकास्तरीय नोडल ऑफिसर म्हणून सावंतवाडी पशुधन विकास अधिकारी यांची नियुक्त केली आहे. सदर कॅम्पला जास्तीत जास्त पशुपालकानी उपस्थित राहावे. बँक मॅनेजर या योजने संदर्भात सविस्तर माहिती देणार आहेत. दरम्यान, किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या बैठकीस येताना कॅम्प मध्येच अर्ज भरून घ्यायचे आहेत. पशुपालकांनी पॅन कार्ड, आधार कार्ड, एक फोटो, सात बारा व आठ अ घेऊन यावेत असे सांगण्यात आले आहे.

You cannot copy content of this page