घोणसरी सोसायटी मार्फत भात खरेदीचा शुभारंभ

*💫वैभववाडी दि.२५-:* घोणसरी येथील विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटी तर्फे नुकतेच भात खरेदीचा शुभारंभ सोसायटीचे चेअरमन रामदास इंदुलकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी घोणसरी गावचे प्रभारी सरपंच विलास मराठे, व्हाईस चेअरमन विठ्ठल बागवे, संचालक दत्ताराम गुरव, रवींद्र सावंत, राजश्री राजेंद्र राणे, तुकाराम जाधव, गजानन देवलकर ,भाई राणे, दीपक राणे, अनंत राणे, दाजी गायकवाड, कृष्णा एकावडे, सिताराम परब व शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. गावातच भात खरेदी करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.तरी घोणसरी गावातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन चेअरमन रामदास इंदुलकर व संचालकांनी केला आहे.

You cannot copy content of this page