*💫मालवण दि.२५-:* मालवण शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रथम व थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलिटेक्निक) प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी पूर्ण झाली असून दुसऱ्या फेरीच्या प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. द्वितीय फेरीमधील जागा वाटप झालेल्या संस्थेमध्ये उमेदवारांनी दि. ३० डिसेंबर ते ०२ जानेवारी या कालावधीमध्ये संस्थेत उपस्थित राहून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे, असे आवाहन मालवण शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी केले आहे. प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीसाठी विकल्प अर्ज (Option Form) हे आपल्या लॉगीन मधून दि.२४ ते २६ डिसेंवर या कालावधीमध्ये भरावे लागणार आहेत. आपण दिलेल्या विकल्पानुसार दुसऱ्या फेरीमध्ये कोणते कॉलेज व शाखा मिळाली आहे किंवा नाही हे आपल्या लॉग इन मध्ये २९ डिसेंबर रोजी समजणार आहे. दुसऱ्या फेरीसाठी झालेले जागा वाटप स्वीकारण्यापूर्वी स्वतः पडताळणी करणे, जागा वाटप स्वीकारणे, जागा स्वीकृती शुल्क भरणे हे दि.३० डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीमध्ये करता येणार आहे. द्वितीय फेरीमधील जागा वाटप झालेल्या संस्थेमध्ये उमेदवारांनी दि. ३० डिसेंबर ते ०२ जानेवारी या कालावधीमध्ये संस्थेत उपस्थित राहून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. शासकीय तंत्रनिकेतन मालवण संस्थेमध्ये एकूण ३२० विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेसह स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी, संगणक (Computer) अभियांत्रिकी, विद्युत (Electrical) अभियांत्रिकी, अणुविद्युत (Electronics & Communication) अभियांत्रिकी, यंत्र (Mechanical) अभियांत्रिकी प्रत्येकी प्रवेश क्षमता ६० व अन्न तंत्रज्ञान (Food Technology) प्रवेश क्षमता- २० या पदविका अभ्यासक्रमाच्या शाखा कार्यान्वित आहेत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९७६४५१३१३३ किंवा ९४२३६८२८४६ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मालवण शासकीय तंत्रनिकेतनच्या कॅप राऊंड-२ प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ
