कोरोना पॉझिटिव्ह ज्येष्ठ व्यवसायिकांच्या मृत्यूने आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क

मालवण दि-: मालवण तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दोन दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या शहरातील एका जेष्ठ व्यवसायिकाचा शुक्रवारी सकाळी ओरोस जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क बनली आहे. दरम्यान, मालवण ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी करण्यात आलेल्या कोरोना रॅपिड अँटिजेंन टेस्ट मध्ये मालवणात कार्यरत असणारे देवगड येथील एक डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. मालवण शहरात राहणारे एक ६६ वर्षीय जेष्ठ व्यवसायिक हे दोन दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज सकाळी त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. काही दिवसांपूर्वी मालवणात कोरोना रुग्णांचे प्रमाण घटून मालवण कोरोना मुक्ती कडे वळत असताना पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. यापूर्वी तालुक्यात १७ जणांनी कोरोनामुळे प्राण गमावला असताना आता कोरोनाने आणखी एका व्यक्तीचा मृत्यू ओढवल्याने आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क बनली आहे. तालुक्यात आतापर्यंत ४८८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर ४३८ जणांनी कोरोनावर मात केली असून १७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

You cannot copy content of this page