२८ रोजी होणार बक्षीस वितरण
*💫दोडामार्ग दि.२४-:* लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोडामार्ग व सिंधु साहित्य संघ दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्ममाने घेण्यात आलेल्या निबंध व चित्रकला स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. चित्रकला स्पर्धेत प्रथम-मंथन तुकाराम गवस(शिरंगे पुर्नवसन) द्वितीय-यशवंत अविनाश भुजबळ(सासोली केंद्रशाळा) तृतीय-समृध्दी सुर्याजी गवस(मांगेली कुसगेवाडी) उत्तेजनार्थ प्रणाली नवनाथ गवस,रिया शांताराम गवस,स्नेहल केशव पाटील तर निबंध स्पर्धेत प्रथम-मानसी मुकुंद कळणेकर(नूतन विद्मालय कळणे) द्वितीय-अपुर्वा अरूण लोंढे(कोनाळकटा हायस्कूल) तृतीय-साक्षी बाबुराव घोगळे(दोडामार्ग हायस्कूल) उत्तेजनार्थ-श्रीपाद महेश कासार,प्रगती ढेमाणा कांबळे,हिमानी राजाराम पार्सेकर,मृदुला दिपक देसाई या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे सर्व यशस्वी विद्मार्थांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने दिनांक २८/१२/२०२० रोजी सकाळी ११ वाजता मणेरी येथे सुरेशभाई दळवी यांच्या कार्यालयात बक्षीस वितरण होणार आहे. तरी यशस्वी विद्मार्थी,शिक्षक,पालक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
