प्रत्येक तालुक्यासाठी व्हेंटिलेटर ॲम्बुलन्स तातडीने सोय करा…

युवा रक्तदाता संघटनेची जिल्हा शल्य चिकित्सकाकडे मागणी*

*💫सावंतवाडी दि.२३-:* जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात व्हेंटिलेटर ॲम्बुलन्स साठी शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी युवा रक्तदाता संघटना,सावंतवाडी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीमंत चव्हाण यांच्याकडे करण्यात आली आहे. जिल्ह्यात व्हेंटिलेटर ॲम्बुलन्स अभावी अनेक रुग्णांचे प्राण गेले असून,जिल्ह्यात फक्त तीनच व्हेंटिलेटर ॲम्बुलन्स आहेत. तसेच सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयाला देखील १०८ ॲम्बुलन्स तातडीने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी संघटनेने केली आहे. तालुक्यात अनेक गावं असल्याने रुग्णांची संख्या देखील जास्त असून, ॲम्बुलन्स अभावी रुग्णांचे प्राण जात आहेत. त्यामुळे तातडीने ॲम्बुलन्स देण्यात यावी अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी, माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीमंत चव्हाण यांची भेट घेऊन केली आहे.

You cannot copy content of this page