आप्पा पराडकर राबवित असलेले लोकोपयोगी उपक्रम स्तुत्य

खास.विनायक राऊत, नाम.अनिल परब, नाम.उदय सामंत यांनी केले कौतुक

*⚡कणकवली ता.२९-:* कामगार नेते तथा सिंधुदुर्ग रत्नागिरीचे लोकसभा सहसंपर्कप्रमुख आप्पा पराडकर पुरस्कृत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सर्व सोयीनियुक्त रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा रत्नागिरी येथे पार पडला. यानिमित्ताने आप्पा पराडकर यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना संघटना आणखी बळकट करताना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भगवा झेंडा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिपित्यर्थ कामगार नेते तथा शिवसेनेचे सिंधुदुर्ग रत्नागिरीचे लोकसभा सहसंपर्कप्रमुख आप्पा पराडकर पुरस्कृत सर्व सोयीनियुक्त रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा शिवसेना सचिव तथा खास.विनायक राऊत, परिवहनमंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत,लोकसभा सहसंपर्कप्रमुख आप्पा पराडकर, शिवसेना युवानेते संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी शासकीय विश्रामगृह येथे दिमाखात संपन्न झाला. यावेळी हिंद कामगारसेना जिल्हाध्यक्ष राजु शेट्ये, उपजिल्हाध्यक्ष बबन शिंदे, सरचिटणीस राजु राठोड, सचिन सावंत, अँड.हर्षद गावडे, रिमेश चव्हाण, वैभव मालंडकर,रूपेश आमडोस्कर,ललित घाडीगांवकर आदी उपस्थित होते. यावेळी खास.विनायक राऊत, परिवहनमंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री नाम.उदय सामंत यांनी कामगार नेते आप्पा पराडकर राबवित असलेल्या लोकोपयोगी उपक्रमाचे कौतुक केले.आप्पा पराडकर यांच्या अशाप्रकारच्या उपक्रमातून शिवसेना पक्ष हा 80 टक्के समाजकारण आणि केवळ 20 टक्के राजकारण या मार्गाने चालत असल्याचे दाखवून दिले असल्याचे ते म्हणाले.

You cannot copy content of this page