शिक्षक व पालकवर्गाने एकत्र येत केली स्वच्छता
*⚡सावंतवाडी ता.२९-:* मळगाव रस्तावाडी येथील शारदा विद्यालय मळगाव या जिल्हा परिषद शाळेच्या आवारात शिक्षक व पालकवर्गाने एकत्र येत स्वच्छता मोहिम राबविली. यावेळी शाळेच्या अंगणात वाढलेला चारा, गवत साफ करण्यात आला. तसेच शाळेभोवती वाढलेली झाडी तोडून परिसर स्वच्छ करण्यात आला. पालकांनी शाळा परिसरात झाडलोट करून परिसर पूर्ण स्वच्छ केला. मुलांच्या आरोग्याची काळजी घेता शाळेच्या मागच्या बाजूला असलेल्या शौचालय परिसरातही साफसफाई करण्यात आली. यावेळी काही नादुरुस्त बेंच दुरुस्तीसाठी काढण्यात आले. या कामात शाळेतील शिक्षक व पालक सहभागी झाले होते. या स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व पालकांचे मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे यांनी आभार मानले. तसेच दुरुस्तीसाठी काढलेले बेंच दिवाळीनंतर दुरुस्त करून घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले