*⚡वेंगुर्ला ता.२९-:* भारतीय जनता पार्टीतर्फे दिपावली सणाचे औचित्य साधून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ४ नोव्हेंर २०२१ रोजी वेंगुर्ला रामेश्वर मंदिराच्या प्रांगणात सायंकाळी ५ वाजता इकोफ्रेंडली आकाशकंदील स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे २०००, १५००, १००० व उत्तेजनार्थ ५०० ची दोन अशा बक्षिसांसहीत प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. ही शहरासह तालुक्यातील सर्व वयोगटातील इच्छूक स्पर्धकांसाठी खुली आहे. स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारण्यात आलेले नाही. एका स्पर्धकाला केवळ एकच इकोफ्रेंडली आकाशकंदील स्पर्धेसाठी सादर करता येईल. स्पर्धेसाठी केवळ इकोफ्रेंडली आकाशकंदील स्वीकरण्यात येतील. कल्पकता, नाविन्यता व आकर्षकतेचा स्पर्धेच्या परीक्षणात विचार केला जाईल. आकाशकंदील बनविताना थर्माकोल, प्रदूषणकारी वस्तू, प्लास्टिकचा वापर करण्यात येऊ नये. सायंकाळी ६ वाजता परीक्षणास प्रारंभ होईल. इच्छूक स्पर्धकांनी आगावू नावनोंदणी व माहितीसाठी ९४२२४३६७७७ या नंबरवर संफ साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
इकोफ्रेंडली आकाश कंदील स्पर्धेचे आयोजन
