उद्योगात नवनवीन टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी यंत्रणा पुरविणार

सावंतवाडी येथे केंद्रीयमंत्री नारायण राणेंचे आश्वासन;विविध व्यवसायातून आर्थिक परिवर्तन करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले

*⚡सावंतवाडी ता.२८-:* जिल्ह्यातील तरुण तरुणींना उद्योग निर्माण करून देणे, रोजगार उपलब्ध करून देणे तसेच देशाचा विकास दर वाढवणे यासाठी. उद्योजकांना चांगल्या टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासाठी मशीन पुरवठा करून उत्पादन चांगल करण्यासाठी प्रवृत्त करणे हे आपले काम असून, ते आपण करणार असल्याचं मत खासदार नारायण राणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील समुद्र किनारी व्यवसाय आणणार असून, फॉरेस्ट सारख्या भागात मधपाशी पासून मध तयार करणे ,तसेच महिलांना अगरबत्ती तयार करणे सारखे , काथा या सारखे व्यवसाय मधून या जिल्ह्याचे आर्थिक परिवर्तन चलतीच करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत मांडले.

You cannot copy content of this page