ज्येष्ठ अभिनेते अनिल गवस यांची उपस्थिती राहणार
*⚡कणकवली ता.२८-:* कणकवली पंचायत समिती व स्नेह सिंधू कृषी पदवीधर संघ यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या व कोविड मुळे गेली दोन वर्षे बंद असलेल्या गावठी आठवडा बाजाराच्या शुभारंभ प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते स्वराज्य रक्षक संभाजी फेम अनिल गवस यांची विशेष उपस्थिती असणार आहे. आमदार नितेश राणे यांच्या हस्ते या गावठी आठवडा बाजाराचा शुक्रवारी सकाळी 10 वा. शुभारंभ करण्यात येत आहे. यानिमित्त अभिनेते अनिल गवस उपस्थिती राहणार आहेत. आठवडा बाजाराच्या शुभारंभप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन सभापती मनोज रावराणे यांनी केले आहे.