माजी पालकमंत्र्यांनी नगरपालिकेत सत्ता गाजवली पण विकास देखील केला नाही

केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे यांचा आम.दीपक केसरकर याना टोला

*⚡सावंतवाडी ता.२८-:* सावंतवाडी शहराचा विकास कसा करता येईल, या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आज सावंतवाडीत आलो असून, वडिलकीच्या नात्याने मार्गदर्शन करणार असल्याचे मत खासदार नारायण राणे यांनी स्पष्ट केले आहे. सावंतवाडी हे महाराष्ट्राचे तसेच देशातील पहिल्या पर्यटन जिल्हा असणाऱ्या सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार असून, त्याचा विकास होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी सावंतवाडी नगरपालिकेच्या कार्यालयासाठी खासदार निधीतून 50 लाखाचा निधी देणार असल्याचे जाहीर केले आहे. देशाचा आर्थिक बजेट ठेवणाऱ्या आठ जनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला घेतले असून, हा खरा सिंधुदुर्गचा बहुमान आहे. येथील पालकमंत्र्यांनी नगरपालिकेत सत्ता गाजवली पण नगरपालिकेच्या कार्यालयाचा विकास देखील केला नाही. अशी टीका नाव न घेता माजी आमदार दीपक केसरकर यांच्यावर केली आहे. विकास करण्यासाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिले असून, विकास करणे तुमची जबाबदारी आहे. त्यासाठी झगडावे लागले तरी तुम्हाला गप्प न बसता झगडले पाहिजे असा सल्ला नगराध्यक्ष यांच्यासह सर्व नगरसेवकांना केला आहे.

You cannot copy content of this page