खासदार विनायक राऊत यांनी प्रवेशकर्त्यांचे केले स्वागत
*⚡कणकवली ता.२७-:* शिवसेनेच्या फोंडाघाट येथे झालेल्या फोंडाघाट जिल्हा परिषदेच्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर प्रेरित होऊन फोंडाघाट येथील असंख्य युवा कार्यकर्त्यांनी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवधनुष्य आपल्या हाती घेऊन फोंडाघाट भगवामय करून टाकले. प्रवेशकर्त्या युवकांमध्ये प्रामुख्याने करण कदम, चिन्मय सावंत, ओंकार पवार, निनाद पारकर ,सहील बीडये, आदेश म्हसकर, जितेंद्र सावंत, रुपेश वाळवे , प्रवीण पडेलकर, हरेश पावसकर, अमोल नवले ,ओंकार हाऊल, शुभम पवार, सौरभ चव्हाण, आकाश गोसावी, रुपेश वाळवे, ओंकार लाड, कीर्तीसिंग जोईल, ऋषिकेश वाळवे, महेश जोइल ,राजा हसनेकर ,रामा वाळवे यांच्या सह फोंडा गावातील असंख्य युवा कार्यकर्ते होते.ह्या युवाई च्या प्रवेशाबरोबरच काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे शिवधनुष्य हाती घेतले.त्यात प्रामुख्याने रवी राणे, वासू वाळवे, ध्रुव लाड, पुंडलिक आरेकर, सत्यवान लाड ,प्रकाश वाळवे वगैरे कार्यकर्ते होते. यावेळी बोलताना खास.विनायक राऊत यांनी प्रवेशकर्त्यांचा योग्य तो मान सन्मान ठेवला जाईल. शिवसेना हा पक्ष नसून कुटुंब आहे. आज आपण सर्वजण आमच्या कुटुंबात सामील झाला आहात ,आता तुमची संपूर्ण जबाबदारी ही शिवसेना पक्षाची असेल.तसेच फोंडा विभागाला विकासासाठी झुकत माप दिले जाईल. फोंडाघाट गावातील प्रलंबित प्रश्न जसे डावा तिर कालवा ,बाजारपेठ रुंदीकरण लवकरच सोडवू. यावेळी व्यासपीठावर खासदारांसोबत जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, अतुल रावराणे, महिला जिल्हा अध्यक्ष नीलम सावंत- पालव, राजू शेट्टये ,शलेश भोगले ,जि. प. सदस्य संजय आग्रे ,माजी सभापती संदेश पटेल, आबु पटेल, कन्हैया पारकर, बाबू राणे, शाम भोवड, सुभाष सावंत, सुरेश टक्के, राजू पटेल, पिंटू पटेल, अवी सापळे, माधवी दळवी, भाई सावंत, कोलते मॅडम, बंटी वरुनकर, पवन भोगले, सौरभ सुतार इत्यादी उपस्थित होते. मेळाव्याचे सूत्र संचालन राजेश रावराणे यांनी केले तर आभार राजन नानचे यांनी मानले.
