नगराध्यक्ष संजू परब यांचा इशारा; त्या भागातील नागरिकांशी केली चर्चा*
*💫सावंतवाडी दि.२१-:* उभाबाजार परिसरात काल पाणी न आल्याने आज उभा बाजार परिसरातील नागरिकांनी नगराध्यक्ष संजू परब यांची भेट घेत याबाबत चर्चा केली.यावेळी शहरात एक वेळ पाणी पुरवठा होत असताना सुरळीत पाणी पुरवठा होत होता. असे मत उभाबाजार परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले आहे. यावेळी त्या भागात अनधिकृत पंप बसवले असून पाण्याची चोरी होत असल्याची शक्यता नगराध्यक्ष संजू परब यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे. यावेळी अनधिकृत पंपाचा शोध घेऊन त्यांचे पाणी कनेक्शन कायम स्वरुपी बंद करून, २० हजार रुपये दंड करण्याच्या सूचना नगराध्यक्ष संजू परब यांनी पाणी पुरवठा अभियंता भाऊ भिसे यांना देण्यात आल्या आहेत. तसेच या भागाची आपण स्वतः मुख्याधिकारी व पाणी पुरवठा अभियंता भाऊ भिसे यांच्या सोबत पाहणी करू असे आश्वासन नगराध्यक्ष संजू परब यांनी नागरिकांना दिले आहे.तसेच पाणीपुरवठा सुरळीत करू असे आश्वासन नागरिकांना दिले आहे.
